Nanded Hospital Tragedy: नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांच्या कालावधीत 16 अर्भकांसह 31 जणांना जीव गमवावा लागल्याच्या दु:खद घटनेनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदारांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी मंगळवारी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. अस्वच्छ स्वच्छतागृह पाहिल्यानंतर पाटील यांनी रुग्णालयाचे डीन श्यामराव वाकोडे यांना वैयक्तिकरित्या स्वच्छता करण्यास सांगितले. ही घटना व्हिडिओमध्ये कैद करण्यात आली आहे. ज्यामध्ये डीन वाकोडे वायपरचा वापर करून शौचालयाची स्वच्छता करताना दिसत आहेत.
नांदेडमधील डॉक्टर शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे डीन डॉ. वाकोडे यांनी सोमवारी सांगितलं की, 24 तासांच्या कालावधीत सहा पुरुष आणि सहा महिला नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, त्यांनी नमूद केले की 12 प्रौढांना इतरांसह साप चावण्यासारख्या विविध परिस्थितींना बळी पडले. त्यानंतर, मृतांची संख्या 31 पर्यंत वाढली. दरम्यान, त्यानंतर 1 ते 2 ऑक्टोबरदरम्यान रुग्णालयात चार अर्भकांसह आणखी सात व्यक्तींनी आपले प्राण गमावले. (हेही वाचा - Varsha Gaikwad On Nanded Hospital Tragedy: राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा; नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी वर्षा गायकवाड यांची मागणी)
#Hingoli MP Hemant Patil got the dirty toilet of the hospital cleaned by Dr. Shyamrao Wakode, the dean of the hospital in Nanded where the patients died.#Nanded pic.twitter.com/PMyfr0P88s
— Amit Sahu🇮🇳 (@amitsahujourno) October 3, 2023
दरम्यान नांदेडच्या दुर्घटनेच्या अवघ्या 24 तासांनंतर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील घाटी येथील शासकीय रुग्णालयात 2 अर्भकांसह किमान 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बळींमध्ये 5 पुरूषांचा समावेश असून त्यांच्या मृत्यूची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.