Breastfeeding: लग्नाच्या दिवशी शौचालयात नवऱ्या मुलाला 'स्तनपान' करत होती त्याची आई; वधूला धक्का
जॉर्जी मिशेलने सांगितले की, लग्न समारंभाच्या अगदी काही वेळ आधी वधूला शौचालयात जायचे होते. घाईगडबडीमध्ये ती टॉयलेटमध्ये गेली आणि समोर जे दिसले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
लग्न (Wedding) हा दोन व्यक्ती, दोन कुटुंबांना एकत्र आणणारा सोहळा असतो. लग्नप्रसंगी अनेक गमती-जमती, भांडणे, मारामाऱ्या इतकेच नाही तर अगदीक खूनही झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. परंतु आता लग्नाच्याबाबतीत इंग्लंडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्याबाबत तुम्ही याआधी नक्कीच ऐकले नसेल. तर या लग्न समारंभाच्या काही वेळ आधी वधूने पाहिले की, शौचालयात तिच्या नवऱ्याला त्याची आई चक्क स्तनपान करत आहे.
होय, विश्वास ठेवायला कठीण अशी ही घटना आहे, मात्र सध्या सोशल मिडियावर याची चर्चा सुरु आहे. हे प्रकरण युनायटेड किंगडमचे आहे. इथल्या 'द अनफिल्टर्ड ब्राइड' या यूट्यूब चॅनलवर वेडिंग प्लॅनर्स लग्नाच्या गोष्टी सांगतात. याच कार्यक्रमात जॉर्जी मिशेल या वेडिंग प्लॅनरने एका लग्नात आई मुलाला स्तनपान करत असल्याची हकीकत कथन केली. जॉर्जीने दावा केला की, ती स्वतः या घटनेची साक्षीदार नव्हती, तर जेनी नावाच्या मेकअप आर्टिस्टने तिला ही गोष्ट सांगितली होती.
जॉर्जी मिशेलने सांगितले की, लग्न समारंभाच्या अगदी काही वेळ आधी वधूला शौचालयात जायचे होते. घाईगडबडीमध्ये ती टॉयलेटमध्ये गेली आणि समोर जे दिसले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. वधूने पाहिले की, आपल्या होणाऱ्या नवऱ्याला त्याची आई स्तनपान करत होती. जॉर्जीचा हा खुलासा ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (हेही वाचा: मसाज पार्लरमध्ये पतीची चालू होती प्रणयक्रीडा; पत्नीने रंगेहात पकडले, सेक्स वर्करला मारहाण)
या पॉडकास्टचे व्हिडिओ रेकॉर्डिंग TikTok वर शेअर करण्यात आले होते. आता ते व्हायरल झाले आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करून स्वतःला बसलेला धक्का व्यक्त केला आहे. स्वतःच्या लग्नात असा धक्कादायक प्रकार पाहिल्यावर वधूने हे लग्न केले की नाही, ही गोष्ट जाणून घेण्यात सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र जॉर्जीने याबाबत काहीही माहिती दिली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2023 09:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

