Bhavana Gawali tied Rakhi to PM Narendra Modi: 'ईडीच्या शुभेच्छा ताई साहेब', शिवसेना खासदार भावना गवळी यांना रक्षाबंधन दिवशी अनोख्या शुभेच्छा
Bhavna Gawli (Photo Credit - Facebook)

शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राखी बांधली. भावना गवळी यांनी फेसबुकवर पोस्ट करुन याबाबत माहितीही दिली. भावना गवळी यांची फेसबुक पोस्ट पाहताच नेटीझन्सनी मात्र भावना गवळी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एका फेसबुक युजरने म्हटले आहे की, 'ईडीच्या शुभेच्छा ताई साहेब,जय बाळासाहेब जय महाराष्ट्र', दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे की, 'ED असे अनेक नातेसंबंध बनवायला भाग पाडले' एका युजर्सने तर भावना गवळी यांना कमेंट बॉक्स मध्ये 'त्या ED वाल्याना पण राखी बांधा जावून आणि तुमच्या जिल्ह्याच्या गबरू ला पण बांधा' असे म्हणत सल्लाही दिला आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्याबद्दल अनेकांनी वेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

खासदार भावना गवळी या कथीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीच्या रडारवर आल्या आहेत. काही काळापूर्वी त्यांना ईडीकडून नोटीसाही आल्या होत्या. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी गेले. महाविकासआघाडीमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. हेच शिंदे पुढे वेगळा गट काढून भाजपसोबत आता मुख्यमंत्री झाले आहेत.

लोकसभेतही शिवसेना खासदारांनी वेगळा गट केला आहे. या गटाने आपला गटनेताही बदलला आहे. भावना गवळी आता या शिवसेनेच्या बदलत्या गटात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे निष्टावान शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. (हेही वाचा, Raksha Bandhan 2022 Funny Memes: सोशल मीडियावर भाऊ-बहिणीसाठी फनी मीम्सचा वर्षाव, सगळीकडे #HappyRakshaBandhan टॉप ट्रेंड)

(फोटो सैजन्य- फेसबुक स्क्रिनशॉट)

भावना गवळी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'अनेक वर्षापासून पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना छोटी बहिण या नात्याने मी राखी बांधत आलेली आहे. आज दिनांक 11/08/2022 रोजी मा पंतप्रधान महोदयांना राखी बांधन्याचे भाग्य प्राप्त झाले. यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाली.'