PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील भाजप (BJP) प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा मंत्रिमंडळविस्तार (Union Cabinet Expansion) आणि काही मंत्र्यांचा खातेबदल (Modi Cabinet Reshuffle) नुकतेच पार पडले. या बदलावर देशभरात चर्चा सुरु आहे. अनेकांनी याला मोदींचा मास्ट्ररस्ट्रोक, सर्जरी वैगेरे म्हटले आहे. काहींनी यावर थेट टीका केली आहे. एनडीएतून बाहेर पडलेला आणि भाजपचा जुना मिंत्रपक्ष राहिलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाने या विस्ताराचे विश्लेशन करताना काही बाबतीत कौतुकाचे तर बऱ्याच अंशी टीकेचा सुर लावला आहे. शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयात ( Dainik Saamana Editorial) केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार टीका केली आहे. ही टीका करताना ' नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱयावर लागलेले ओंडकेच आहेत' असा जोरदार टोला भाजपला लगावला आहे. दैनिक सामना (Dainik Saamana) संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे.

हा तर पंकजा मुंडे यांना संपविण्याचा डाव

भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कंन्या पंकजा मुंडे यांच्या भगिणी प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणे अपेक्षीत होते. परंतू ते स्थान त्यांना मिळू शकले नाही. यावरुन मुंडे भगिणी नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना मुखपत्रात यावर भाष्य करताना म्हटले आहे की, 'श्री. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे' (हेही वाचा, PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार- नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांना केंद्रात मंत्रिपदे; थोडक्यात जाणून घ्या कारणे)

नारायण राणे धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत

नारायण राणे यांच्याबाबत मिष्कील टीप्पणी करत आणि काहीसा सल्लावजा चिमटा काढत शिवसेने म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातून अखेर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते, पण लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही. राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.'

हा तर भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार

'कपिल पाटील, डॉ. भारती पवार हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे, असं शिवसेनेने म्हटले आहे.

मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य लाटेबरोबर वाहून किनाऱयावर लागलेले ओंडके

“पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळय़ांचेच लक्ष लागले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल वगैरे दोन्ही झाले आहेत. कोसळलेली अर्थव्यवस्था, कोरोना महामारीने निर्माण केलेले आरोग्यविषयक अराजक, शिक्षणातील गोंधळ, महागाई, बेरोजगारीची खडखड यावर ‘उतारा’ म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसून आपल्याच टेबलावर ठेवले आहेत. या मंत्रिमंडळ फेरबदलाचे वैशिष्टय़ काय? तर वाजपेयी काळातील एक राजनाथ सिंग व मुख्तार अब्बास नकवी हे दोन सोडले तर बाकी सर्व पत्ते नवेच आहेत. एक तर नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱयावर लागलेले ओंडकेच आहेत,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.