शिवसेनेचा मुख्यमंत्री हिच गोड बातमी, संजय राऊत यांचा पुनरुच्चार
Sanjay Raut (Photo Credits: ANI)

राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल हिच गोड बातमी असेल, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी आपल्याला मिळेल असे विधान सरकार स्थापनेसंदर्भात केले होते. या विधानावर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम असल्याचे ठासून सांगितले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष कोणत्या टोकाला जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आज (बुधवार, 6 नोव्हेंबर 2019) सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत बोलत होते.

सगळ्यात मोठ्य पक्षाने राज्यपालांना भेटणं हे त्यांच कर्तव्यच आहे. भाजप जर राज्यपालांना भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने सरकार स्थापन करावे. राज्यपालांच्या भेटीत भाजपने 145 आमदारांची यादीही सादर करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु, काँग्रेस नेत्याने 'सामना' कार्यालयात घेतली शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट)

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण उद्या चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेणार आहोत, असे सांगितले. मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रियेनंतर काही मिनीटांतच राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी बोलताना भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही राऊत यांनी या वेळी सांगितले.