मुंबई: गेट वे ऑफ इंडिया  वर शिल्पा शेट्टी सह योगा प्रेमींनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस 2019
Shilpa Shetty (Photo Credits: Twitter)

Yoga Day Celebration in Mumbai:  बॉलिवूडची ठुमका गर्ल शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या सिनेसृष्टीपासून लांब गेली असली तरीही तिच्या फीटनेसमुळे आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ आहे. डाएट आणि योग साधना करून आरोग्य जपणारी शिल्पा आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून सकाळी गेट वे ऑफ इंडियावर ( Gateway of India )योगा करण्यासाठी पोहचली होती. मुंबईकर योगाप्रेमीं समवेत शिल्पाने यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा केला आहे.Yoga Day 2019: 21 जून दिवशीच जागतिक योग दिन का साजरा केला जातो?

 गेट वे ऑफ इंडियावर  शिल्पा शेट्टीने साजरा केला योगा डे! 

भारतासह जगभरात आज योगाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांचीत जागतिक योग दिन 2019 साजरा केला. 2015 साली पहिला योगदिन साजरा करण्यात आला होता.

यंदाच्या योग दिनाची थीम 'Yoga For Heart' आहे. या दिवसाचं औचित्य साधून हृद्याच्या आरोग्यासाठी योगाभ्यास कसा फायदेशीर आहे हे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध स्तरावर काम केले जात आहे. बदलत्या जीवनशैलीसोबत वाढणारे आजाराचे प्रमाण लक्षात घेता अत्याधुनिक वैद्यशास्त्राच्या जोडीने प्राचीन योगाभ्यास करणंदेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.