आज संपुर्ण जगभरात 'आंतरराष्ट्रीय योगा दिवस' (International Yoga Day) म्हणून साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून योगसाधनेचे महत्त्व जनतेला पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: 40,000 लोकांसोबत योगसाधनेला बसले. रांची येथील प्रभात तारा मैदानावर या योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त रांचीच नाही तर देशभरातले कोट्यवधी लोक योग दिनाननिमित्त योगासनं करणार आहेत.
दिल्लीत ३०० ठिकाणी योग शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. क्लायमेट अॅक्शन या थीम अंतर्गत योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. रांची येथील प्रभात तारा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी योगासनं करणार असल्याने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे हरयाणा येथील रोहतक या ठिकाणी योगासनं करणार आहेत. तर नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेवबाबांसोबत योगासनं केली.
#WATCH Jharkhand: PM Modi performs yoga at Prabhat Tara ground in Ranchi on the occasion of #InternationalDayofYoga. https://t.co/uIIvg30dZ0
— ANI (@ANI) June 21, 2019
प्रभात तारा मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. .या योग शिबीराच्या माध्यमातून मोदी जनतेचे योगसाधनेचे महत्त्व, त्याचे फायदे लोकांना पटवून देणार आहे.
तसेच दिल्लीत देखील आज योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. क्लायमेट अॅक्शन या थीम अंतर्गत योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील रोहतक या ठिकाणी योगासनं करत आहेत. तर नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु रामदेव बाबांसोबत योगासनं केली.
आज संपूर्ण जगात भारतासह पाचवा योग दिवस साजरा करण्यात येतो आहे. योग करण्याची आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची ही परंपरा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.