Yoga Day 2019 Celebration in Maharashtra: जागतिक योग दिनाचं औचित्य साधून आज भारतासह जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या' सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. 2015 सालपासून जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रात राज्यस्तरीय योग दिनाचं आयोजन नांदेड येथे करण्यात आलं आहे. आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह योग गुरू बाबा रामदेव समवेत सामुहिक योग अभ्यास करून योगादिनाच्या सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages
बाबा रामदेव सह मुख़्य मंत्री देवेंद्र फडणवीस योगा करताना
#WATCH: Yoga guru Baba Ramdev performs yoga along with Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in Nanded on #InternationalDayofYoga. #Maharashtra pic.twitter.com/XiIqXZCblp
— ANI (@ANI) June 21, 2019
Yoga guru Baba Ramdev performs yoga along with his followers in Nanded on #InternationalDayofYoga; Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis also present. #Maharashtra pic.twitter.com/K9KZcPsmfg
— ANI (@ANI) June 21, 2019
महाराष्ट्र राज्याकडून नांदेडच्या मामा चौक या मैदानात राज्य सरकारकडून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली सार्यांनी योगासनं करत आजच्या दिवसाची सुरूवात
केली आहे.