International Yoga Day 2019 Marathi Messages: 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. भारताच्या प्राचीन ठेव्यातील एक 'योग' आता 'योग दिना'मुळे जगभरात पोहचला आहे. औषधोपचारासोबत अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी 'योगाभ्यास' फायदेशीर ठरला आहे. त्यामुळे जर तुम्ही यंदाच्या योग दिनाचं औचित्य साधून नियमित योगाभ्यासाला सुरूवात करणार असाल तर त्याची काही ध्येय ठेवा. तसेच ही सवय तुमच्या सोबत तुमच्या मित्रपरिवारातही शेअर करायची असतील तर या WhatsApp Status, Facebook Messenger च्या माध्यमातून या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की शेअर करा. यंदाचा जागतिक योगदिन 'Yoga For Heart' थीमवर; रांची मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साजरा करणार योगा डे!
आंतरराष्ट्रीय योग दिन शुभेच्छा
योगः कर्मसु कौशलम्
योग करेल रोज
त्यापासून दूर राहील रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
२१ जून
आंतरराष्ट्रीय योग दिन
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
Yoga Day 2019 GIFs
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ शुभेच्छापत्र
आंतरराष्ट्रीय योग दिन 2019 चे सेलिब्रेशन यंदा भारत सरकारकडून रांची मध्ये होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे 50,000 नागरिक सहभाग घेणार आहेत. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.