Shiv Sena (UBT): लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) तोंडावर आली असताना आणि कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना (UBT) पक्षाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे (Shilpa Bodkhe) यांनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X हँडलवर शेअर केला आहे. तसेच, या राजीनाम्याबाबत एक सविस्तर पोस्ट आणि उद्धव ठाकरे यांना उद्दशून खरमरीत पत्रही त्यांनी लिहीले आहे. ज्यामध्ये त्यांनी 'पक्षामध्ये माझा टिशू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद!' असे म्हटले आहे. तसेच, संघनेतीलच दोन वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांबद्दल आक्षेप नोंदवत त्यांनी पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडला आहे.
शिल्पा बोडके यांची X पोस्ट
'रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच'
शिल्पा यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझा शिवसेना (UBT) पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र.. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे. पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते उद्धव ठाकरे (@AUThackeray) जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन. पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा. आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा. (हेही वाचा, Uddhav Thackeray On BJP At Sawantwadi: 'आज नाहक त्रास देताय', थांबा, आमचेही दिवस येतील! उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि सत्ताधाऱ्यांना थेट इशारा)
शिल्पा बोडके यांचे पत्र
टिशू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद!
दरम्यान, शिवसेना पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत असताना मी पक्षाचे काम अहोरात्र करत राहिले. मात्र, विशाखा राऊत, रंजन नेवाळेकर शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत राहिल्या. मला शोशल मीडिया या पदावर काम करायचे नाही म्हणून मी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पत्र देखील पाठवले. परंतू, विशाखा राऊत यांना मी काम करु नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असे वाटत आहे. जर त्यांना संघटना वाढविण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात येवढा आनंद होत आहे तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडीचा संपर्क प्रमुख व प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. माझा पक्षात टिशू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद!, असे म्हणत शिल्पा बोडके यांनी आपल्या मनातील नाराजी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.