सलीम कुत्ता (Salim Kutta) प्रकरणात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर आणि इतर नेत्यांवर झालेल्या आरोपांचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात जोरदार खंडण केले. या प्रकरणात व्हायरल करण्यात आलेले आणि दाखविण्यात येणारे फोटो हे नाशिकचे मुस्लिम धर्मगुरू शेहेर-ए-खतीब (Sheher-E-Khatib) यांच्या पुतण्याच्या लग्नातील आहेत. ज्यामध्ये गिरीश महाजन किंवा इतर काही लोक दिसत आहेत. पण शेहेर-ए-खतीबचा दाऊद इब्राहिमशी कोणताही संबंध नाही यावर त्यांनी भर दिला आणि चौकशी समितीच्या अहवालाने असे कोणतेही संबंध नसल्याची पुष्टी केली, असल्याचेही त्यांनी सांगितले. हे फोटो सलिम कुत्ता यांच्याशी संबंधीत पार्टी, विवाहातील नव्हेत, असेही ते म्हणाले.
गिरीश महाजन यांना क्लिन चिट
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, मंत्री गिरीश महाजन आणि इतर नेते शेहेर-ए-खतीब यांच्या पतण्याच्या लग्नाला उपस्थित होते. या पैकी कोणाचेही दाऊद इब्राहिमशी कोणतेही कौटुंबिक संबंध नव्हते. त्यांच्यापैकी कोणीही दाऊदशी संबंधीत गुन्हेगारी कारवायांशी संबंधीत असल्याचे आढलून आले नाही, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Raj Thackeray: प्रश्न अदानीला उत्तर चमच्यांकडून, शालीचे वजन पेलतंय का? मोदींनी चंद्रावरुन वाहतूक सुरु केली; उद्धव ठाकरे बरसले)
आरोप करण्यापूर्वी पुरावे द्यावेत
दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या आरोपांना उत्तर देताना, तत्कालीन गृहमंत्री असलेले फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. समितीने आपल्या अहवालात शेहेर-ए-खतीबचा दाऊद इब्राहिमशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले. दरम्यान, फडणवीस यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करावेत, असेही अवाहन केले. (हेही वाचा, Nagpur: नाशिकमधील UBT शिवसेना नेत्याची दाऊदच्या टोळीच्या सदस्यासोबत पार्टी, नितेश राणेंनी दाखवला फोटो; देवेंद्र फडणवीसांनी दिले SIT चौकशीचे आदेश, Watch Video)
खडसे यांचे आरोप बिनबुडाचे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांबद्दल विरोधकांनी माफी मागावी असे आवाहन केले. हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले आणि चौकशी समितीच्या निष्कर्षांनी मंत्री निर्दोष असल्याचा स्पष्ट पुरावा दिला, असल्याचेही ते म्हणाले.
व्हिडिओ
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says in the Legislative Council, "The wedding that Girish Mahajan and all the party leaders and some officials went to was the wedding of the nephew of the biggest Muslim religious leader of Nashik, Sheher-E-Khatib. Sheher-E-Khatib is not… pic.twitter.com/GFBcPsuA0z
— ANI (@ANI) December 18, 2023
राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशना नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान, दाऊदचा कथीत हस्तक सलीम कुत्ता याच्या नातेवाईकाचा विवाह पार पडला. या विवाहात राज्यातील काही राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. लग्नाच्या पार्टीमध्ये ते नाचही करत असल्याचा एक व्हिडिओ कथितरीत्या प्रसारीत झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. या व्हिडिओवरुनच सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ज्याचे पडसाद विधिमंडळातही उमटल्याचे पाहायला मिळाले.