Nagpur: नाशिकमधील UBT शिवसेना नेत्याची दाऊदच्या टोळीच्या सदस्यासोबत पार्टी, नितेश राणेंनी दाखवला फोटो; देवेंद्र फडणवीसांनी दिले SIT चौकशीचे आदेश, Watch Video

नितेश राणे, दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्याला कुणाचा वरदहस्त आहे का, याचीही SIT माध्यमातून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Nagpur: नाशिकमधील UBT शिवसेना नेत्याची दाऊदच्या टोळीच्या सदस्यासोबत पार्टी, नितेश राणेंनी दाखवला फोटो; देवेंद्र फडणवीसांनी दिले SIT चौकशीचे आदेश, Watch Video
Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter/ANI)

Nagpur: नाशिकमधील UBT शिवसेना नेता दाऊदच्या टोळीच्या सदस्यासोबत पार्टी करताना आढळला. या नेत्याचे नाचतानाचे पार्टी करतानाचे फोटोज आज नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हिवाळी अधिवेशनातील सत्रात दाखवले. याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली आहे. नितेश राणे, दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्याला कुणाचा वरदहस्त आहे का, याचीही SIT माध्यमातून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या विधानभवनाच्या बाहेर नागपुरात बोलताना भाजप नेते नितेश राणे यांनी एक फोटो दाखवला. त्यांनी नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह उद्धव ठाकरे (यूबीटी) सेना गटाचे नेते सहभागी झाल्याचा आरोप केला.  जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सलीम कुट्टाने पॅरोलच्या शेवटच्या दिवशी कथित पार्टी केली तेव्हा ही पार्टी झाली, असे राणे यावेळी म्हणाले. अशा दहशतवाद्यांशी राजकीय नेत्यांचे संगनमत योग्य उदाहरण मांडत नाही, असंही राणे यावेळी म्हणाले. राणे यांनी पत्रकारांना असेही सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे पालकमंत्री दादाभुसे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेतली असून त्यांनी  या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा - Nagpur: राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ महाराष्ट्र विरोधी पक्षाच्या आमदारांनी तळले पकोडे (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).