काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे (Eknathrao Salve) यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी चंद्रपुरात (Chandrapur) राहत्या घरी आपल्या अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी या मूळ गावी त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहे. एकनाथराव साळवे यांच्या निधनावर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माझ्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे सहकारी असलेले ॲड. एकनाथ साळवे यांचे दु:खद निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. एकनाथ साळवेंना सुमारे 11 वर्षे विधिमंडळ सदस्य म्हणून अगदी जवळून पाहता आले. तद्नंतरही त्यांची साथ आणि स्नेह सतत लाभला, अशा आशयाचे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. हे देखील वाचा- Karnataka: महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला; कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील मराठी भाषेतील फलक काढले
शरद पवार यांचे ट्वीट-
माझ्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे सहकारी असलेले ॲड. एकनाथ साळवे यांचे दु:खद निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. एकनाथ साळवेंना सुमारे ११ वर्षे विधिमंडळ सदस्य म्हणून अगदी जवळून पाहता आले. तद्नंतरही त्यांची साथ आणि स्नेह सतत लाभला. pic.twitter.com/5bBq9tX3OO
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 13, 2021
एकनाथ साळवे हे केवळ राजकीय नेते म्हणून नव्हेतर नक्षलवाद्यांचे आणि आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांची ख्याती होती. 1992 साली तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यावर सरकार-नक्षली यांच्यात मध्यस्थी घडवून आत्राम यांची सोडवणूक करण्यात एकनाथराव साळवे यांचा मुख्य वाटा होता.
याशिवाय, त्यांनी कायदा आणि नक्षलवाद या विषयावर पुस्तक लिहली आहेत. त्यांनी लिहलेली एन्काऊंटर ही कांदबरीने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. साळवे यांच्या निधनावर अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.