शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीवरुन दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा: रोहित पवार
रोहित पवार (फोटो सौजन्य-फेसबुक)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) लढवणार नाही असे जाहीर केले. त्यामुळे राजकरणातील इतर पक्षात याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच मावळ येथून पार्थ पवार यांची उमेदवारी काल शरद पवार यांनी जाहीर केली. त्यामुळे रोहित पवार यांचे काय अस देखील प्रश्न उपस्थित केले गेले. तर आता रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राजकरणातील बडे लोक साहेबांच्या राजकरणाचा गौरव करतात. तसेच सर्वसामान्य जनतासुद्धा साहेबांबद्दल काय म्हणतात याकडे ही ते लक्ष देतात. त्यामुळेच गेली 52 वर्ष फक्त राजकरण नाही तर समाजकारणात देखील ही एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभी राहील असे सर्वसामान्यांचे मत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-लोकसभा निवडणूक 2019: मावळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार रिंगणात; शरद पवार यांनी दिले संकेत)

त्याचपुढे साहेबांच्या प्रत्येक विचाराचा आदर आहे. पण आदराच्या पुढे प्रेम असून माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर साहेब तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा असे मला वाटत असल्याचे रोहित यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात मोदी यांची हवा असून शरद पवार यांना बदलेल्या हवेचा अंदाज येतो असे म्हटले होते. तर पार्थ पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.(हेही वाचा-शरद पवार माढा येथून निवडणुक लढवणार नाहीत)