संपूर्ण जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयाची काल घोषणा करण्यात आली. त्यावेळी शिवसेना (Shivsena)-भाजप (BJP) यांनी एकमेकांवर गेली चार वर्षे आरोपप्रत्यारोपानंतर युती करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. या स्थित आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले मतं मांडून हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होतेच हे माहिती असल्याचे म्हटले आहे.
आगामी लोकसभा-विधानसभा भाजप आणि सेनेने एकत्र लढावी ही जनभावना असल्याने त्याचा आदर राखत आम्ही युती करत असल्याची घोषणा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र युतीबाबत या दोन्ही पक्षावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. तर शिवसेनेने स्वबळ बाजूला ठेवून युती केली अशी टीका केली जात आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी ही उडी घेतली असून हे दोन्ही पक्ष गेली चार वर्षे एकमेकांवर प्रत्येकवेळी टीका करत असल्याचे म्हटले आहे. तसेच अवघ्या महाराष्ट्राने या दोघांनी केलेल्या आरोपप्रत्यारोपाची चांगलीच जाणीव आहे. परंतु जनता कौल देणार नाही असे शरद पवारांनी म्हणत भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.(हेही वाचा-शिवसेना-भाजप युतीला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत - नारायण राणे यांचे भाकीत)
शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता शिवसेना-भाजप काय उत्तर देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तसेच युतीसंदर्भात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरवला गेला आहे. त्याचसोबत शिवसेनचा स्वबळाचा नारा ते नाणार प्रकल्पात शेतकर्यांच्या मदतीला खरंच शिवसेना आली का? याबद्दल टीका करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा युती फार चांगली कामगिरी करू शकणार नाही असे भाकीत राणेंनी केले आहे.