Sharad Pawar on Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शरद पवार यांचे परखड भाष्य;  रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह
Sharad Pawar on Babasaheb Purandare | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर परखड भाष्य केले आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरे यांच्याईतका अन्याय आपल्या लेखणातून कोणीच केला नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पार पडला. या वेळी आयोजित ते बोलत होते. या वेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी (Ramdas Swami) आणि दादोजी कोंडदेव (Dadoji Konddev) यांचे योगदान काय असाही थेट सवाल शरद पवार यांनी केला. या कार्यक्रमास इतिहास अभ्यास राजकुमार घोगरे, श्रद्धा कुंभोजकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांनी या वेळी बोलताना म्हटले की, रायगडावर असलेली शिवछत्रपती यांची समाधी महात्मा फुले यांनी प्रथम शोधली. शिवाजी महाराज यांचा उल्लेख महात्मा फुले यांनी छत्रपती न करता 'कुळवाडी भूषण' असा केला. परंतू, बाबासाहेब पुरंदरे यांनी वेगळीच भूमिका मांडत खोटा इतिहास पसरवला. मला असे वाटते की, आपल्या लिखाणातून शिवछत्रपती यांच्यावर बाबासाहेब पुरंदरे यांनी जेवढा अन्याय केला तेवढा कोणीच केला नसेल, असे पवार म्हणाले. (हेही वाचा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रकाश पवार, नीलिमा लोया यांचा आदर्श; वयाचा आणि आजाराचा विचार न करता बजावला मतदानाचा हक्क)

छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी दिशा दाखवली त्या केवळ त्यांच्या मातोश्री जिजाऊ होत्या. त्यामधे इतर कोणाचेही योगदान नाही. असे सांगतानाच छत्रपतींच्या कामगिरीमध्ये रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. त्यासोबतच बाबासाहेब पुरंदरे यांनी जी मांडणी केली आहे ती पाहता वास्तव आणि मांडणी यात खूप फरक आहे. सत्य जाणून घेणारी कोणतीच व्यक्ती पुरंदरे यांच्या लिखानावर विश्वास ठेवणार नाही, असेही पवार म्हणाले.