Simran Budharup share video PC Insta

Lalbaugcha Raja: कुमकुम भाग्य आणि पांड्या स्टोअर या मालिकेतील अभिनेत्री सिमरन बुधरुप हिने नुकतेच तिच्या आईसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान अभिनेत्री सिमरन बुधरुप हिच्या आईसोबत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले. या घटनेचा तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आरोप केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- अनंत चतुर्दशी दिवशी लालबागचा राजा लालबाग मार्केट ते गिरगाव चौपाटी हा प्रवास कसा करतो? जाणून घ्या मार्गे इथे

मिळालेल्या माहितीनुसार, सिमरनने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि त्यात पोस्टवर लिहले की, लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी सिमरन आणि तिची आई रांगेत उभे होते. त्यावेळीस तीची आई फोटो आणि व्हिडिओ शूट करत असताना अचानक एका कर्मचाऱ्यांने त्यांचा फोन हिसकावून घेतला. त्यांनी फोन घेण्याचा प्रयत्न केला परंतू कर्मचाऱ्याने त्यांना ढकलले. सिमरनने मध्यस्थी केल्यावर एका महिला बाउन्सरने तिच्याशी गैरवर्तन केले. बाउन्सरने दोघांना धक्काबुक्की केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Simran Budharup 🇮🇳 (@simranbudharup)

सिमरनने पोस्ट केलेल्या व्हिडिओत ती ओरडताना दिसत आहे. 'असे करू नका! तू काय करतोय?' असा काहीसा आवाज ऐकू येत आहे. कर्मचाऱ्यांना ती अभिनेत्री असल्याचे लक्षात येताच धक्काबुक्की करणे थाबंवले जाते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वाईट वागणुकीचा अनुभव तीनं इन्टाग्रामच्या पोस्टवर लिहला आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी देखील यावर खंत व्यक्त केला.