New Mumbai: तुर्भे येथे अमेरिकन नागरिकाकडून महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Sexual harassment Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

New Mumbai: नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये महिला हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याप्रकरणी पोलिसांनी 26 वर्षीय अमेरिकन नागरिकाविरुद्ध (American Citizen) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी 11.30 वाजता तुर्भे (Turbhe) परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये घडली. 23 वर्षीय महिलेने हॉटेलमधील एका अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला तेव्हा आरोपीने टॉवेल काढला आणि तिच्याकडे लैंगिक मागणी केली.

पीडितेने नंतर पोलिसांकडे तक्रार केली ज्यानंतर शनिवारी रात्री अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील रहिवासी असलेल्या पुरुषाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354A (लैंगिक छळ) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा -Thane Crime: पतीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घरगुती वादातून कृत्य; 61 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल)

दुसऱ्या एका घटनेत नवी मुंबई पोलिसांनी एका भिकाऱ्याला नेरूळ येथे एका महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बिअरच्या बाटलीने मारल्याच्या आरोपाखाली अटक केली. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. 4 डिसेंबर रोजी ही घटना घडली, त्यानंतर आरोपी 26 वर्षीय इमाम हसन शमशुद्दीन याला अटक करण्यात आली. पीडितेचे वय 21 वर्षे असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Own Kidnapping Case: वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, वसई येथील धक्कादायक प्रकार)

नवी मुंबईतील ऐरोली येथील राहणारी ही तरुणी एका मैत्रिणीसह नेरूळ येथील महाविद्यालयात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास ती परिसरातील एका बसस्थानकावर उभी असताना भिकारी घटनास्थळी आला आणि त्याने कोणतीही चिथावणी न देता बिअरच्या रिकाम्या बाटलीने तिच्यावर हल्ला केला.