कल्याण (Kalyan) येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशन (Kolsewadi Police Station Kalyan) हद्दीतून चार जणांना अटक झाली आहे. चौघापैकी एक जण अल्पवयीन आहे. या चारही जणांवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assaults) केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीला काही बहाण्याने घराबाहेर बोलून या चौघांनी मित्राच्या घरी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल राजभर (वय 18), सुजल रमेश गवती ( वय 20 ) विजय राजेश बेरा (वय 21) अशी या प्रकरणातील तिघांची नावे आहेत. तर चौथा आरोपी अल्पवयीन आहे.
घटनेबाबत माहिती अशी की, पीडित मुलगी ही कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कुटुंबीयांसह राहते. पीडित मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. आरोपीपैकी एकाने पीडितेला 24 एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर मेसेज केला. त्याने मेसेजमध्ये सांगितले की, माझ्या प्रेयसीला वाटते की, माझे तिच्यापेक्षा तुझ्यावरच अधिक प्रेम आहे. तेव्हा तू प्रत्यक्ष तिला भेटून सांग की आपल्यात तसे काहीच नाही. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. आपल्यात केवळ मैत्री असल्याचे तिला सांग. आरोपीवर विश्वास ठेऊन पीडिता भेटण्यास तयार झाली. (हेही वाचा, Mumbai: विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये गोरेगावमधील कारपेंटरने काढली तरुणीची छेड; आरोपीला अटक)
दरम्यान, आोरपीने पीडितेला एक ठिकाणी बोलावून तिला मित्राच्या घरी नेले. तेथे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला असा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे या चौघांपैकी एकजण तिचा मित्र आहे. आरोपीने पीडितेला उल्हासनगर येथील एका इमारतीत नेल्याची माहिती आहे.
आरोपींनी पीडितेला सोडले नव्हते. त्यामुळे घरातून बाहेर गेलेली मुलगी बराच वेळ उलटूनही परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. कोळसेवाडी पोलिसांनीही तातडीने तपास यंत्रणा राबवली. दरम्यान, आरोपींनी पीडितेवर सलग दोन दिवस आळीपाळीने बलात्कार केला. अखेर कल्याण रेल्वे स्थानकात कोळसेवाडी पोलिसांना पीडिता 26 एप्रिल रोजी आढळून आली.