Jalna Murder Case: सुशील पवार नावाच्या लिंगपीसाट तरुणाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. होणाऱ्या पत्नीची विवाहापूर्वीच हत्या करुन नराधम सुशील याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. ही घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा गावात घडली. सुशील याने हाणारी पत्नी दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (17) हिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले त्यानंतर हत्या करुन पोबारा केला होता. दिप्ती आणि सुशील यांचा विवाह ठरला होता. धक्कादायक म्हणजे 18 फेब्रुवारी दोघांचा विवाह संपन्न होणार होता. या विवाहाचा बस्ता बांधण्यासाठी दोघाच्याही घरचे लोक दुसरबीड येथे गेले होते. त्यामुळे सपना घरी एकटीच होती.
मोबाईल देण्याच्या बहाण्याने सुशील पवार (होणारा पती) सपनाच्या घरी गेला. ती घरात एकटी असल्याची संधी साधून त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सपनाने त्याला आरडाओरडा करत विरोध केला. होणाऱ्या पत्नीचा विरोध पाहून सुशील पवार भलताच चिडला. त्याने तिला मारहाण तर केलीच. परंतू, धारधार शस्त्राने तिच्यावर वार करुन तिला जखमी केले. त्याने तिचा गळाही आवळला. ज्यात सपनाचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Extramarital Affair: विवाहितेचा प्रियकरासोबत गळफास, दोरी तुटली म्हणून महिला वाचली, एकाच मृत्यू)
सपना हिला भेटायला येताना सुशील दीप्तीच्या घरी आला होता. सपना हिची हत्या करुन भेदरलेल्या अवस्थेत निघून जाताना त्याने आपल्या दुचाकीने एका बाईला धडक दिली आणि तो खाली पडला. या वेळी गावातल्याच दोन व्यक्तींनी त्याला ओळकले होते. विवाह तोंडावर आल्याने काही कारणाने हा मुलगा सासरवाडीला आला असेल त्यामुळे या व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, सुशील आपल्या दुचाकीवरुन चांगेफळ शिवारात आला. त्याने दुचाकी तिथे लावून सिंदखेडराजा गाठले. सिंदखेडराजा येथून तो पुणे आणि पुढे मुंबईला गेला.
मुंबईला गेलाला सुशील थेट गुजरातला निघून गेला. अहमदाबाद येथे जाऊन काही नोकरीकरण्याचा त्याचा विचार होता. पण, तेथे त्याला कोणतेहीकाम मिळाले नाही. त्यामुळे तो परत मुंबईला आला. पोलीस त्याच्या मागावर होतेच. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केला असता त्याचे शेवटचे लोकेशन वसई आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करून सेवली पोलिसांच्या स्वाधीन केले.