Shiv Sena Corporator Sunil Surve Passed Away: शिवसेना पक्षाचे जेष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे यांचे आज निधन
Sunil Surve (Photo Credit: Twitter)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे जेष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे (Sunil Surve) यांचे आज निधन झाले आहेत. उल्हासनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुनिल सुर्वे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतले होते. परतुं, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत होत असल्याने ते ऑक्सिजनची लहान बॉटल घेऊन फिरत होता. महत्वाचे म्हणजे सुनिल सुर्वे हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यांची बायपास सर्जरी झाली होती. मात्र, 2 दिवसापूर्वी श्वास घेतना श्वास होऊन लागल्याने त्यांना मॅक्स लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या अकाली निधनाने उल्हासनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सुनील सुर्वे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जवळपास 23 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर मात करून ते घरी आले होते. सुनील सुर्वे हे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. अभ्यासू असलेले सुर्वे हे महापालिका सभागृह दणाणून सोडत असत. त्यांच्या निधनाने संघटनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे देखील वाचा- इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने एमएमआरडीएचे संचालक कुलवेंद्र सिंह कपूर यांचा मृत्यू

ट्वीट-

पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,महापौर लिलाबाई आशान,सभागृहनेते राजेंद्र चौधरी,जेष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, धनंजय बोडारे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी शोक व्यक्त केला आहे. या महापालिकेच्या निवडणुकीत सुनील सुर्वे हे उल्हास स्टेशन मराठा सेक्शन परिसरातून महापौर लिलाबाई आशान, नगरसेवक शेखर यादव,नगरसेविका मिताली चानपूर यांच्यासोबत निवडून आले होते.