Kulvindar Singh Kapur (Photo Ccredit: Twitter)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) संचालक कुलवेंद्र सिंह कपूर (Kulvindar Singh Kapur) यांचे चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलवेंद्र सिंह हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाने तातडीने सर्वांना माहिती दिली. त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, ही आत्महत्या आहे की घातपात आहे? याचा शोध स्थानिक पोलीस करत आहेत.

कुलवेंद्र सिंह कपूर (55) हे वांद्रे कुर्ला संकुलातील एका इमारतीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होते. मात्र, शुक्रवारी रात्री इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगा घरातच होते. अपघानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून बीकेसी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

ट्वीट-

कुलवेंद्र सिंह कपूर हे एमएमआरडीएच्या सेवेत दाखल होण्याआधी पश्चिम रेल्वे येथे कार्यरत होते. 2 जुलै 2019 पासून ते एमएमआरडीएमध्ये कार्यरत होते. मात्र अचानक त्यांच्या मृत्यूची बातमीने सर्वांनाच धक्का दिला आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी कुलवेंद्र सिंह कपूर यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.