Kishori Pednekar (Photo Credit: Twitter)

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर (Mumbai Municipal Corporation Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या थोरल्या भाऊ सुनिल कदम (Sunil Kadam) यांचे आज कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. सुनिल यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून महापालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या आठवणीत किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. मात्र, सध्या मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठे यश आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. दरम्यान, सर्वसामान्यासह अनेक राजकीय नेते आणि कलाकार कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. एप्रिल महिन्यात मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यादेखील 14 दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या. हे देखील वाचा- गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलिस दलातील 232 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर एक जणांचा मृत्यू

किशोरी पेडणेकर यांचे ट्वीट-

राज्यात शुक्रवारी 10 हजार 320 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 265 जणांचा मृत्यूही झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 14 हजार 284 वर पोहचली आहे. यापैकी 87 हजार 074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 6 हजार 353 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.