शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते शशिकांत चव्हाण यांच्या हाती पुन्हा शिवबंधन
Shivsena (Photo Credits: PTI)

शिवसेना (Shiv Sena) सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते शशिकांत चव्हाण (Shashikant Chavan) यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले आहे. शिवसेनेत एकेकाळी ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण मध्यंतरी काही कारणामुळे भाजपात गेले होते. मात्र आज त्यांनी पुन्हा भाजपला रामराम करत महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा मुंबई येथे शिवसेनेत शिवसेनेत परतले आहेत. तसेच शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल अशा चर्चांनी उधाण आले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. अनेक वर्षे त्यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषवले होत. मात्र काही कारणाने शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपची उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या खेड , दापोली , मंडणगड, गुहागर ,चिपळूण या तालुक्यात मोठी ताकद वाढली होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांनी रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Interview: तुम्हाला 'यम' हवा की 'संयम' हवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठा प्रमाणात पक्ष प्रवेश झाले होते. मात्र, आता सत्ता जाताच भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.