CM Uddhav Thackeray Interview: तुम्हाला 'यम' हवा की 'संयम' हवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

'तुम्हाला 'यम' (Yum) हवा की 'संयम' (Restraint) हवा' अशी शाब्दिक कोटी करतानाच 'माझ्यात आत्मविश्वास आहे, जे काम हाती घेतलंय ते मी पूर्ण करुन दाखवणारच', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या कार्यशैलिवर टीका करणाऱ्या टीकाकार आणि विरोधकांना उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दै. सामना (Daily Saamana) या शिवसेना (Shiv Sena) मुखपत्रास एक मुलाखत दिली. ही मुलाखत काही भागात प्रकाशित आणि प्रसारित होत आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित, प्रसिद्ध झाला. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक, शिवसेना खासदा संजय राऊत यांनी घेतली.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एक उदाहरण देतो. एक शब्द आहे संयम. या शब्दाची एक खास गंमत आहे. एका अक्षरानेही फरक पडतो. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे अक्षराअक्षराने जुळून शब्द बनतो. त्या शब्दांचे मंत्र होतात. शब्दाची ओवी पण होते आणि शिवीसुद्धा होते. आता संयमाचं उदाहरण घ्या. या संयमातला 'स' काढला तर काय होईल? त्यामुळे संयम हवा की यम हवा तुम्हीच ठरवा. आपल्या नेतृत्वाखाली काम सकारात्मक चालले आहे. राज्याला उर्जा मिळतेय या सगळ्या गोष्टी लोकांनी स्वीकारल्या आहेत, याकडे आपण कसे पाहता अशा आशयाचा प्रश्न राऊत यांनी मुलाखती दरम्यान विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तारादाखल ते बोलत होते. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Interview: महाविकासआघाडी सरकारचं भविष्य विरोधी पक्षाच्या हातात नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात विवध मुद्द्यांवर भाष्य केले. यात महाविकासआघाडीची स्थिरता, निर्णयक्षमता, तिन्ही पक्षांतील समन्वय, विरोधकांचे आरोप, राज्यासमोरील आव्हाने आणि कोरोना व्हायरस, लॉकडाऊन या नंतर नवी सुरुवात, स्टार्टप, एमओयू... यांसह अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.