Pune Accident: पुण्यात BMW कारची आणि स्कूल बसची एकमेकांना धडक लागल्याने अपघात घडला आहे. हा अपघात पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरात घडला आहे. या अपघातात शाळेतील दोन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. (हेही वाचा- वरळीत थरारक अपघात, BMW ची धडक, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, स्कूल बस विरुध्द दिशेने जात होती. त्याचवेळीस BMW कार भरधाव वेगाने आली. दोन्ही वाहनांची एकमेकांना धडक झाली. या धडकेत स्कूल बसची समोरील काच फुटली आणि कारचे देखील भरपूर नुकसान झाले. बसमध्ये 15 विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातातून सुदैवाने 13 विद्यार्थी सुखरुप वाचले. ही घटना दुपारी सुमारे 12.30 च्या आसपास घडली.
अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पालकांनी आणि नागरिकांनी धाव घेतली. या प्रकरणी संतप्त पालकांनी चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अपघातानंतर विद्यार्थी घाबरले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पिंपरी चिंचवड येथील पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे. जखमी विद्यार्थ्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरुच आहे. त्यामुळे एकीकडे नागरकी संतापले आहे. तर दुसरीकडे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला.