Mumbai Hit-and-Run: वरळीत थरारक अपघात, BMW ची धडक, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यानंतर मुंबई शहरात देखील अपघाताची मालिका सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका BMW ने महिलेला चिरडले. या घटनेत तीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एका BMW कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Hit-and-Run: वरळीत थरारक अपघात, BMW ची धडक, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai Hit-and-Run: पुण्यानंतर मुंबई शहरात देखील अपघाताची मालिका सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका BMW ने महिलेला चिरडले. या घटनेत तीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एका BMW कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वरळी येथील आहे. या घटनेनंतर मुंबई शहर पुन्हा हादरले आहे. (हेही वाचा- वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

मिळालेल्या माहितीनुसार,  20 जुलै रोजी वरळी एका कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात वरळी येथील सीफेस येखील एजी खान अब्दूल गफार खान रोडवर घडला. जखमीवर नायर येथील रुग्णालयात उपचार सुरु केले. उपचारादरम्यान शनिवारी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

चालकावर गुन्हा दाखल 

विनोद लाड असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विनोद गेले आठ दिवस रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होता. अन् अखेर त्याला मृत्यूने गाठले. या घटनेनंतर विनोदच्या कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला. अपघातानंतर विनोदच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

असा झाला अपघात

विनोदच्या भावाने सांगितले की, विनोद दुचाकीवरून कामाला जात होता. दरम्यान भरधाव कारने मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, विनोद दुचाकीवरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आठ दिवस तो मृत्यूंशी झुंज देत होता.

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).