Savitribai Phule Pune University च्या पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा प्रश्नावलीत PoK चा आक्षेपार्ह उल्लेख, चूक लक्षात येताच पुणे विद्यापीठाकडून माफी मागत संबंधित विभागाकडून स्पष्टीकरण मागवल्याची माहिती
Pune University (Photo Credits: Wiki Commons)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये पाकव्याप्त कश्मीरचा (POK) उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरला गेल्याची गोष्ट समोर आली आहे. ही सामाजिक आणि धार्मिक भावनांना दुखावणारी गोष्ट असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र विद्यापीठाला ही चूक लक्षात येताच त्यांनी तातडीने माफी मागत संबंधित विभागाकडे कारणे दाखवा नोटिस पाठवल्याचं विद्यापीठाचे उप कुलगुरू नितीन कर्माळकर यांनी सांगितलं आहे. TOI च्या रिपोर्ट्सनुसार, कर्माळकर यांनी ही चूक पेपर सेट करणार्‍या व्यक्तीच्या नजरेत आली नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं हे होणं अपेक्षित नव्हतं. मात्र झाल्या प्रकाराबाबत आम्ही दिलगिर आहोत. मंगळवारी पुणे विद्यापीठाने माफीनामा जाहीर करतानाच संबंधित विभागाचे प्रश्नप्रत्रिका बनवणारे प्रमुख यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे असे देखील सांगितले आहे.

वाणिज्य शाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या Defence Budgeting या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाकव्याप्त कश्मीर बद्दल आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आला होता. ही परीक्षा शुक्रवारी 23 ऑक्टोबर दिवशी पार पडली आहे. Competitive Exam Guide: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ UPSC परीक्षांसाठी राबवणार विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम.  

ANI Tweet

सोशल मीडियामध्ये पुणे विद्यापीठाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. काहींनी त्यावर आक्षेप नोंदवले. विद्यापीठाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माफी मागत कारवाईची भूमिका घेतली आहे. यंदा कोरोना वायरस संकटामुळे राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत. तारखांच्या गोंधळानंतर, ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक घोळ आणि आता सदोष प्रश्नपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांना मोठे अडथळे पार करत आता परीक्षा द्याव्या लागत आहेत.

दरम्यान विद्यार्थ्यांचा आरोप आहे की पुणे विद्यापीठाच्या अन्य परीक्षा प्रश्नावलींमध्येही अनेक चूका आहेत. राज्यशास्त्राच्या एका विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार मॉडर्न हिस्ट्रीच्या विषयामध्ये एक चूकीचा प्रश्न होता. एम ए जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनीदेखील चूकीच्या प्रश्नांची तक्रार केली आहे. दरम्यान याबाबत खुलासा देताना कर्माळकर यांनी प्रश्नपत्रिकेत चूका होणं अपेक्षित नाही. कारण यामध्ये 1 चेअरमन आणि 2-3 तज्ञ शिक्षक समिती असे एकत्र प्रश्नपत्रिका बनवत असतात.