Satara Police: सातारा येथील मिठाई व्यवसायिकास तीस लाखांच्या खंडणीसाठी बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Cyber Crime | Representational Image | (Photo Credits: Pixabay)Crime

सातारा (Satara) येथील प्रसिद्ध मिठाई व्यवसायिक (Sweets Professional) मोदी मिठाईवाला यांना तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचा धक्कादाय प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी व्यावसायिक प्रशांत मोदी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाठिमागील आठ दिवसांपासून मोदी यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन सतत फोन येत आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीकडून त्यांना 30 लाख रुपये खंडणी दिली नाही तर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात येत आहे. मोदी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत याबाबत सांगण्यात आले आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे साताऱ्यातील व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशांत मोदी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना पाठीमागील आठ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कॉल येत आहेत. फोन करणारा व्यक्ती 30 लाख रुपये दे अन्यथा बॉम्बने उडवून टाकीन अशी धमकी देत आहे. कोणीतरी गंमत करत असेल म्हणून मोदी यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, धमकीचे फोन वारंवार येऊ लागल्याने मोदी यांनी पोलिसांत रितसर तक्रार दिली. आतापर्यंत सुमारे 10 ते 12 वेळा मोदी यांना विशिष्ट आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन धमकी आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सततच्या येणाऱ्या फोनमुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे वाटत असल्याने आपण तक्रार देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Satara Fire: घरगुती भांडणातून पतीने पेटवलं घर, आगीचा भडका उडाल्याने आजूबाजूची 10 घरं खाक)

प्रशांत मोदी यांनी सातारा सायबर पोलीस ठाण्यात मेलद्वारे प्रथम या प्रकाराची तक्रार दिली. त्यानंतरत सायबर पोलिसांनी घटनेची माहिती घेून तपास सुरु केला आहे. विवध अंगांनी तपास करुन फोन करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मोदी यांना आलेला फोन नेमका कोणत्या भाषेतून होता याबाबत माहिती मिळू शकली नाही.