kidnap | (Photo credit: archived, edited, representative image)

पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी (Ransom) चक्क एका डॉक्टरांचेच अपहरण केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथे घडली आहे. डॉ. संजय राऊत (Doctor Sanjay Raut) असे अपहरण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. राऊत हे मंगळवारी रात्री आपल्या रुग्णालयातून घरी परतत होते. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले. अपहरण कर्त्यांनी डॉक्टरांच्या रुग्णालयात फोन करुन अपहरण केल्याची माहिती देत पाच कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकारानंतर शहरभर खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास मोहिम हाती घेतली आहे.

प्राप्त माहितीनुसार, डॉ. संजय राऊत हे फलटण शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. शहरातील सिद्धनाथ रुग्णालयात ते कार्यरत असतात. मंगळवार (19 फेब्रुवारी) रोजी रात्री दहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरुन घरी निघाले होते. दरम्यान, मोटारीतून आलेल्या काही लोकांनी डॉ. राऊत यांना एकट्याला गाठले आणि त्यांचे अपहरण केले. अपहरण कर्त्यांनी डॉक्टरांच्याच मोबाईलवरुन सिद्धनाथ रुग्णालयात फोन केला. आम्ही डॉक्टरांचे अपहरण केले असून, त्यांची सुखरुप सुटका करायची असेल तर, पाच लाख रुपये तयार ठेवा, अशी मागणी केली. या प्रकारानंतर रुग्णालयात भीतीचे आणि गोंधलाचे वातावरण तयार झाले. (हेही वाचा, पश्चिम बंगाल: भाजप नेत्याच्या मुलीचे अपहरण, संतापलेल्या जमावाकडून तृणमूल काँग्रेस आमदाराच्या वाहनावर दगडफेक)

दरम्यान, घडल्या प्रकाराची माहिती फलटण पोलिसांना समजली. मिळालेल्या माहितीनुसार, फलटण विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ अभिजित पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पथके रवाना करुन तपास सुरु केला आहे. फलटण शहर पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.