Maharashtra Political Crisis: 'त्या' शिवसेना आमदाराबद्दलचा संजय राऊतांनी केलेला दावा ठरला खोटा ?
Sanjay Raut (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ सुरू असतानाच शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाचा एक आमदार भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ताब्यात असल्याचा दावा केला होता. शिवसेना नेत्याने रात्री उशिरा ट्विट करून आमदाराचे मुंबईतून अपहरण केल्याचा आरोप केला होता.  आमदाराने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला पण गुजरात पोलिस (Gujrat Police) आणि गुंडांनी त्यांना मारहाण केल्याचा दावाही त्यांनी केला. गुजरातमध्येही मुंबईचे गुंडे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राज्यसभा खासदाराने ट्विट केले आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) सुरतमध्ये भाजपच्या ताब्यात आहेत. त्यांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले होते.

त्यांनी सोमवारी रात्री स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुजरात पोलिस आणि गुंडांनी त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला केला. मुंबईचे गुंडही तेथे आहेत. गुजरातच्या भूमीवर हिंसाचार? दुसरीकडे, गुजरातमधील सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला होता. बुधवारी सकाळी सर्व आमदार सुरतहून गुवाहाटीला गेले. मात्र त्यांनी केलेला दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. कारण सर्व आमदारांचा व्हायरल व्हिडिओमध्ये शिंदेंना पाठिंबा दिसत आहे.

गुवाहाटीला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले माझ्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, ते हिंदुत्व आम्ही पुढे नेत आहोत. बाळासाहेबांचे हिंदुत्व मग ते सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी, हे धगधगते हिंदुत्व आहे. ही भूमिका आम्ही घेत आहोत. आपण सर्व बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही, असेही ते म्हणाले. हेही वाचा Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना कायम ठेवण्यासाठी आम्ही इच्छुक, एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी विमानतळावर दिली प्रतिक्रिया

बाळासाहेबांचा विचार पुढे नेऊन समाजकार्य व राज कार्य केले जाईल. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार देशाला दिला असून त्याच्याशी तडजोड केली जाणार नाही. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी प्रदेश भाजप नेत्यांची बैठक झाली, त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन आदी उपस्थित होते. दुसरीकडे, शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केला आहे की पक्षाचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाशी पुन्हा युती करण्याची विनंती केली.

बंडखोर नेत्याशी बोलण्यासाठी ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि शिंदे यांचे सहकारी रवींद्र फाटक यांना सुरतला पाठवले होते, असे या नेत्याने सांगितले. ते म्हणाले की, सुरतहून ठाकरे यांना फोन केला होता. विशेष म्हणजे शिंदे हे सोमवारी रात्रीपासून पक्षाच्या इतर काही आमदारांसह सुरतमध्ये आहेत. नेत्याने सांगितले, मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्याशी फोनवरही चर्चा केली, त्यादरम्यान शिंदे यांनी ठाकरेंना भाजपशी युती करण्यास आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती तोडण्यास सांगितले. काय उत्तर दिले ते माहित नाही.