Sanjay Raut: मी तुरुंगात असताना भाजपाला असुरी आनंद, हे तर मुघल शासन; शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात
Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) स्तुती सुमन उधळली आहेत तेच दुसऱ्या बाजूला भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) १४ दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra) प्रवासानंतर आता मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दिशेने रवाना झाली आहे. या यात्रेत शिवसेना आमदार आणि शिवसेना पक्षप्रमुखांचे पुत्र खुद्द आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या यात्रेत सहभाग होत राहुल गांधींना पाठींबा दर्शवला होता. आता आदित्य पाठोपाठ संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील राहुल गांधींचं एक सच्चा राजकीय नेता म्हणून कौतुक केलं आहे. संजय राऊत म्हणालेत भारत जोडो यात्रेत व्यस्त असताना देखील राहुल गांधी यांनी खुद्द मला फोन करत माझ्या तब्बेतीची चौकशी केली. तबेतीची काळजी घ्या आपण पुन्हा एकत्र काम करुया असं राहुल गांधी म्हणाले,  असं संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं आहे.

 

तेच दुसऱ्या बाजूला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेत्यांवर मात्र निशाणा साधला आहे. वैचारिक आणि राजकीय मतमतांतर असले तरी राहुल गांधी (Rahul Gandhi) एक उत्तम मित्र आहेत. तर माझे भाजपतही अनेक मित्र आहे. पण मी तुरुंगात असताना मात्र भाजप (BJP) आनंद होतं. पण हा तर भाजपचा असुरी आनंद होता. अशा प्रकारचे राजकारणी असणं म्हणजे हे तर मुघल शासन (Mughal Era) होय असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. (हे ही वाचा:- Nitesh Rane Statement: उद्धव सेनेच्या युवराजांची व्यथा आपणच समजू शकतो, नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा)

 

तुरुंगातून सुटल्या नंतर संजय राऊत पहिल्यांदाच आपल्या खमक्या स्टाईमध्ये भाजपवर (BJP) टीका करताना दिसले. तरी राऊतांच्या बोलण्यातून हे पूढे आलं की भाजपत माझे अनेक मित्र आहेत पण संकटकाळात माझी कोणी विचारपूस केली नाही. तोच राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मात्र वेळात वेळ काढून माझी विचारपूस केली असं संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.