Sanjay Raut Press Conference | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज शिवसेना भवन येथे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेत आहेत. ही पत्रकार परिषद संजय राऊत यांची नव्हे तर शिवसेनेची असेल, असे संजय राऊत यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत संजय राऊत कोणावर बाण सोडणार याबातब उत्सुकता आहे. भाजपचे 'साडेतीन नेते' हे अनिल देशमुख यांच्या बाजूला तुरुंगात जातील असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेकडो शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. रज्यातील विविध ठिकाणांहून शेकडो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकांनी 'खोटारड्यांच्या आयचा घो' अशी वाक्ये असलेले टीशर्ट परीधान करुन उपस्थिती लावली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या पत्रकार परिषदेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना सत्तेत आहे. त्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखा शिवसेनेचा एक सोज्वळ चेहरा हा मुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे शिवसेना शांत आहे. सत्तेत आहे आणि शांत आहे याचा अर्थ आम्ही 'गां*' ची आवलाद नाही. खोटारड्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीच आमचे शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषद घेत असल्याची भावना शिवसैनिक प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त करत आहेत. (हेही वाचा, Nawab Malik On Devendra Fadnavis: हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू, नवाब मलिक यांची फडणवीस यांच्यावर टीका)

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबाबत विचारले असता भाजप नेते सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना या पत्रकार परिषदेबाबत विचारले असता ही पत्रकार परीषद झाल्यावरच काय ते बोलता येईल असे पाटील म्हणाले. तर, संजय राऊत यांच्या विधानांना आम्ही स्फोट मानत नाही. त्यांची पत्रकार परिषद ही फुसका बार ठरेल असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.