काल तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज या घटनेचे पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयटी (IT) सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे. तरी आता फक्त महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभरात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून या घटनेवर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहे. कॉंग्रेससह (Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) शिवसेना खासदार संजय राऊत यांना पाठींबा दर्शवण्यात आला आहे. विविध नेत्यांकडून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. तरी केंद्र सरकारकडून राजकीय अजेंडांसाठी ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयटी (IT) सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहेत आणि या एजन्सींच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना गप्प करण्यासाठी ताब्यात घेतलं जात असल्याची टीका केंद्र सरकारवर केली जात आहे. (हे ही वाचा:-Sanjay Raut Case: ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
Shiv Sena MP Priyanka Chaturvedi gives suspension of business notice in Rajya Sabha on "misuse of premier investigative agencies such as ED, CBI & IT by Central govt for political agendas & detaining opposition leaders through these agencies in a bid to silence them."
— ANI (@ANI) August 1, 2022
ED ka dhyaan kidhar hai,
Fraud toh dekho idhar hai! #SillySouls https://t.co/DCF4WreKrr
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) July 31, 2022
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी काल संजय राऊत याच्यावरील ईडी कारवाईनंतर ट्वीट केल होत ज्यात लिहलं आहे, तेरा ध्यान किधर है, फ्रॉड इधर है आणि याबरोबर एक्सप्रेस न्यूज सर्विस या वृत्तपत्राने स्मृती इराणीच्या मुलीबाबत छापलेलं वृत्त जोडण्यात आलं आहे. म्हणजे या ट्वीट मधून खासदार प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊत यांना पाठींबाचं नाही तर थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर हल्लाबोल केला आहे.