शिवसेना पक्षासोबत सरकार स्थापन करणे म्हणजे काँग्रेसला जमिनीत गाडून घेण्यासारखे- संजय निरुपम
संजय निरुपम (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीचे (ShivSena-Congress-NCP) आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे एकत्रित येणे काही नेत्यांना खटकत असल्याचे समोर आले आहे. यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी संभाव्य आघाडीला विरोध दर्शवला आहे. तसेच शिवसेनापक्षासोबत सरकार सत्ता स्थापन करणे म्हणजे काँग्रेसला गाडून घेण्यासारखे आहे, असे वक्तव्य करुन संजय निरुपम यांनी सर्वत्र खळबळ निर्माण केली आहे. शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर इतर राज्यातील अगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसेल, अशी शक्यता काँग्रेसच्या काही नेत्यांनी व्यक्त केली होती.

संजय निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या एकत्र येण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. काँग्रेसने शिवसेनाला पाठिंबा देऊ नये इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 'काही वर्षांपूर्वी काँग्रेसने बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून चूक केली होती. तेव्हा असा धुव्वा उडाला होता की अजून काँग्रेस त्यातून सावरली नाही. महाराष्ट्रात आम्ही पुन्हा तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वत:ला जमिनीत गाडून घेण्यासारखे आहे. काँग्रेस अध्यक्षांनी कुठल्याही दबावाखाली निर्णय घेऊ नये. त्यातच पक्षाचे भले आहे,' असे संजय निरुपम म्हणाले आहेत. हे देखील वाचा- राज्यात लवकरच स्थिर आणि लोकाभिमुक सरकार अस्तित्वात येईल; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

संजय निरुपम यांचे ट्वीट-

संजय निरुपम यांनी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहे. त्यांनी काँग्रेसचे खासदार म्हणूनही कारभार संभाळला आहे. तसेच मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी योग्यरित्या पार पाडली आहे. सध्या महाराष्ट्राचे राजकारण अधिकच पेटले असून राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.