राज्यात लवकरच स्थिर आणि लोकाभिमुक सरकार अस्तित्वात येईल; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
Nawab Malik, Prithviraj Chavan | (Photo Credits: ANI)

Maharashtra Govt Formation: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस (Shiv Sena-NCP-Congress Alliance या तिन्ही पक्षांचे सरकार लवकरच अस्तित्वात येईल. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून राज्याला लवकरच स्थिर आणि लोकाभिमुक सरकार (Democratic Government) मिळेल. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच ही चर्चा संपुष्टात येऊन किमान समान कार्यक्रम अस्तित्वात येईल. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चर्चा सुरु आहे. लवकरच अंतिम निर्णय कळवण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी दिल्ली येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. माजी मुख्यमंत्री, काँग्रेस (Congress नेते पृथ्वीराज चव्हाण (rithviraj Chavan आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या बैठकी नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची एक बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीसाठी दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडल्याने ही चर्चा सरकारस्थापनेच्या अंतिम निर्णयाप्रत पोहोचली असावी, असे मानले जात आहे

एएनआय ट्विट

दरम्यान, राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची नैतिक जबाबदरी शिवसेना-भाजप यांच्यावर येते. (हेही वाचा, आमदार फोडायचा प्रयत्न केला तर, डोकी फोडू, हातपाय तोडू; शिवसेना आमदाराचा इशारा)

शिवसेना-भाजप यांनी निवडणूकपूर्व युती केली आहे. त्यामुळे ही जाबबदारी अधिक वाढते. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि समसमान सत्तावाटप या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये वितूष्ट आले आहे. या पार्श्वभूमिवर विधानसभेतील सर्वाधीक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणे अपक्षीत होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे राज्यात भाजपेत्तर पक्ष आघाडी करुन सत्तेवर येणार अशी चिन्हे आहेत. मात्र त्यांचेही घोडे किमान समान कार्यक्रमावर अडले आहे.