MNS Maha Adhiveshan: आज (23 जानेवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी महाअधिवेशनाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. या अधिवेशनाला पक्षातील अनेक बडे नेते तसेच राज्यातील विविध भागातून आलेले कार्यकर्ते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते संजय नार्वेकर यांनी देखील या अधिवेशनाला हजेरी लावली असून एक महत्त्वाचा ठराव मंडल आहे. 'सांस्कृतिक महाराष्ट्र' असा हा ठराव आहे.
'सांस्कृतिक महाराष्ट्र' हा ठराव मांडताना, मराठीतील अभिनेते संजय नार्वेकर यांनी कलाकारांशी संबंधित विविध मुद्द्यानावर भाष्य केलं. तसेच त्यांनी राज ठाकरे यांचा 'जाणता राजा' असं उल्लेख केला व मराठी कलाकारांच्या पाठीशी उभा राहणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख सांगितली. स्वतःबद्दल बोलताना संजय नार्वेकर म्हणाले की ते मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झाले परंतु, राज ठाकरे यांनी त्यांच्यासारख्या अनेक कलावंतांना स्वस्त दरात, नियमाने परडवणारी घरं मिळवून देण्यासाठी पाठपुरवठा केला.
अमित ठाकरे यांंची मनसेच्या नेते पदी निवड; महाअधिवेशनामध्ये मांडला पहिला ठराव
दरम्यान आजच्या अधिवेशनात संजय नार्वेकर यांनी मांडलेल्या ठरावात गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मुद्दा देखील मांडण्यात आला. गडकिल्ल्याचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे आणि ते कसे करण्यात येणार आहे ते त्यांनी सांगितले. नाट्यगृहांची अवस्था सुधारावी, प्रायोगिक रंगभूमी जोपासणं आणि ती वृद्धिंगत करण्याची किती आवश्यकता आहे त्यांनी सांगितलं. तसेच मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा व मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये प्राइम टाइम मिळाव यासाठी ते कार्यरत असतील असं म्हणाले.