अमित ठाकरे यांंची मनसेच्या नेते पदी निवड; महाअधिवेशनामध्ये मांडला पहिला ठराव
Amit Raj Thackeray | Photo Credits: Instagram

MNS Maha Adhiveshan 2020: मनसेच्या मुंबईतील पहिल्या महाअधिवेशनामध्ये आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. गोरेगाव येथील नेस्को संकुलामध्ये आज आयोजित पहिल्या महाअधिवेशनामध्ये मनसेचा नवा झेंडा महाराष्ट्रासमोर आला त्या पाठोपाठ आता अमित ठाकरेंची नेतेपदी निवड करून त्याचं राजकारणामध्ये लॉन्चिंग करण्यात आलं आहे. मनसे महाअधिवेशनामध्ये व्यासपीठावर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण विषयाशी संबंधित ठराव मांडला आहे. जाणून घ्या अमित ठाकरे यांच्याबद्दल खास गोष्टी 

27 वर्षीय अमित ठाकरे यांनी मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकरत शिक्षण विषयाशी संबंधित पहिला ठराव मांडला आहे. हा ठराव मांडताना 27 वर्षात पहिल्यांदा व्यासपीठावर उभा आहे. काल रात्री मला माझ्यावर पडणार्‍या जबाबदारीबद्दल सांगण्यात आल्याने दबाव असल्याचं म्हटलं आहे. आज मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत खास चर्चा केली होती.

ANI Tweet  

आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच त्यांचे चुलत बंधू अमित ठाकरे सक्रिय राजकाराणामध्ये येणार का? या प्रश्नाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. आज या सार्‍या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपावली आहे. अमित ठाकरे यांच्यावरील नव्या जबाबदारीची व्यासपीठावरून घोषणा होताच ठाकरे कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. सध्या अमित ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज ठाकरेंच्या सभा आणि रॅलींमध्ये अमित ठाकरे उपस्थित असायचे. मात्र अमित ठाकरेवर कोणतीही अधिकृत जबाबदारी नव्हती. मात्र आता अमित ठाकरेंवर मनसेमध्ये नेते पदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.