महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज राज्यव्यापी महाअधिवेशन (MNS Maha Adhiveshan) आयोजित करण्यात आले आहे. सकाळपासूनच अधिवेशनाला सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळेपूर्वीच पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. तसेच राज ठाकरे हे आज त्यांच्या मुलाला म्हणजेच अमित ठाकरे यांना राजकारणात लाँच करणार (Amit Thackeray) असे देखील बोलले जात आहे. त्या आधी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अमित ठाकरे यांच्याविषयी 'या' काही खास गोष्टी.
राज ठाकरे यांच्ये पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. ते राजकारणात पूर्णपणे सक्रिय नसले तरीही ते आपल्या सोशल मीडिया मार्फत सामान्य नागरिकनांच्या समस्या वारंवार मांडत असतात. त्यांनी अलीकडेच त्यांचे स्वतःचे फेसबुक पेज सुरु करून लोकांशी थेट संवाद साधला होता. तसेच आरे वृक्षतोड प्रकरणी देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मंडळी होती.
अमित यांनी मनसेच्या काही आंदोलनांमध्ये देखील सहभाग घेतला होता. नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या रखडल्या होत्या. त्या विरुद्ध मनसेने काढलेल्या थाळीनाद मोर्चाचे नेतृत्त्व अमित ठाकरे यांनी केले होते.
विशेष म्हणजे अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्याप्रमाणेच उत्तम आर्टिस्ट आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रांचा वारसा आता राज ठाकरे चालवत आहेत. परंतु, अमित देखील एक उत्तम चित्रकार आहेत हे फार कमी जणांना माहित आहे. त्यांनी एकदा राज ठाकरे यांचे एक चित्र काढून सोशल मीडियावर शेअर केले होते.
दरम्यान, त्यांचं खाजगी आयुष्य पाहता, काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे यांनी आपल्या बालमैत्रिणीशी म्हणजेच मिताली बोरुडे हिच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला राजकारणातील अनेक बड्या मान्यवरांनी हजेरी लावली होती.