Sanjay Kakde (Photo Credits: Facebook), Shivsena, BJP logo (Photo Credits: File Image)

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 5 दिवस उलटून गेले असले तरी सरकार स्थापनेवर अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत हालचाल घेतलेली दिसत नाही. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) हे मित्रपक्ष असूनही दोन्ही पक्षांमध्ये अजूनही हेवेदावेच सुरु आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेला उशीर होत असल्याचे समोर येत आहे.

शिवसेना मुख्यमंत्री पद मिळावं या मुद्द्यावर अडून बसली आहे तर भाजप शिवसेनेलाच भीती दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

शिवसेनेने 56 जागी विजय मिळवला असला तरी आज भाजपचे खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी मात्र मोठं विधान करत शिवसेनेला एक नवी भीती घातली आहे. शिवसेनेच्या 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय काकडे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय यांनी हा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील असाच एक खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की भाजपाचे ५० आमदार आमच्या संपर्कात असून ते आपल्याला शिवसेनेत घेण्याची मागणी करत आहेत.

'आमच्याकडे इतर पर्याय पण आहेत', शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजप ला इशारा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तेच पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे तर दुसरीकडे शिवसेनेचा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'आमच्याकडे इतर पर्याय पण आहेत' असं म्हणत भाजपला सतर्कतेचा इशाराच जणू दिला आहे.

आमचं ठरलंच नव्हतं; पाचही वर्षं मुख्यमंत्री भाजपचाच: देवेंद्र फडणवीस

दोन्ही पक्ष आपापल्या परीने मुख्यमंत्री पद आपल्याकडेच राहावं यासाठी प्रयत्नात आहेत. आणि त्याच अनुषंगाने एकमेकांना भीती दाखवत दबाव आणण्याचा प्रयत्न पण करताना दिसत आहेत.