Sameer Wankhede यांना बॉम्बे हाय कोर्टात तूर्तास दिलासा; मुंबई पोलिसांना अटकेपूर्वी 3 दिवस द्यावी लागणार नोटीस
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबई एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांच्या विरोधात सध्या तक्रारी दाखल झाल्याने मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या चौकशीसाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. यामध्ये अटकेच्या भीतीने आज समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात पोहचले आहेत. दरम्यान त्यांनी सीबीआय किंवा अन्य केंद्रीय पथकाकडून तपास व्हावा अशी मागणी केली आहे. बॉम्बे हाय कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी किमान 3 दिवस नोटीस दिली जाईल असं म्हटलं आहे.

समीर वानखेडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यांनी सरकारी नोकरी बळकवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा मंत्री नवाब मलिकांचा दावा आहे तर आर्यन खान ड्र्ग्स केस मध्ये पंच असलेल्यांनी आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटीचे डील झाले असून त्यातील काही भाग समीर वानखेडे घेणार असल्याचा दावा केला आहे. सध्या एनसीबी दिल्लीचं पथक त्यांची चौकशी करत आहे. दिल्लीच्या पथकाकडून चौकशी होत असताना मुंबई पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी कशाला? असा सवाल विचारत त्यांनी मुंबई पोलिस आपल्याला लक्स्य करतील त्यामुळे NIA, CBI कडे तपास द्यावा अशी समीर वानखेडेंची याचिकेत मागणी आहे. Kranti Redkar's Letter To CM Uddhav Thackeray: क्रांती रेडकर चं पती समीर वानखेडेंवरील आरोप-प्रत्यारोपांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; 'एक मराठी माणूस म्हणून न्यायाची अपेक्षा'.

ANI Tweet

सध्या समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे 4 तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनीही तपासासाठी एक समिती नेमली आहे. काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेंनी मुंबई पोलिस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचाही त्यांनी दावा केला होता.