Mumbai Police and Saif Ali Khan | Instagram

वांद्रे येथील करिना- सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) राहत्या घरी चोरीच्या बहाण्याने आलेल्या एका व्यक्तीने सैफ वर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. आज सकाळी एका व्यक्तीला वांद्रे पोलिस स्टेशन (Bandra Police Station) मध्ये आणण्यात आले. दरम्यान काल जारी सीसीटीव्ही फूटेज वरून हा व्यक्ती तोच असावा जो जिन्यातून जाताना दिसत आहे. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (17 जानेवारी) वांद्रे पोलिस स्टेशन मध्ये चौकशीसाठी आणलेला व्यक्ती हा सैफ अली खान च्या प्रकरणाशी जोडलेला नाही. अद्याप सैफ वर झालेल्या हल्ला प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा ताब्यातही घेण्यात आलेला नाही.

मुंबई पोलिसांची सैफ अली खान प्रकरणी माहिती

सैफ अली खान वर 16 जानेवारीच्या मध्यरात्री अडीजच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसला. या व्यक्तीने करिनाचा लहान मुळगा जेह आणि त्याच्या सांभाळासाठी असलेल्या बाईला आवाज न करण्याच्या आणि आपणाला 1 कोटी द्या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यानंतर जेहची आया जोरात ओरडली आणि सैफ, करिना धावत तेथे पोहचले. चोरासोबत झालेल्या झटापटीमध्ये सैफ ला 6 जखमा झाल्या आहेत. सैफ वर सध्या लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती ठीक आहे.

दरम्यान पोलिस, फॉरेंसिक लॅब यांच्याकडून कालच सैफच्या घराची तपासणी झाली आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.