साई दर्शनासाठी (Sai Darshan) जाणाऱ्या भक्तांना आता आधार कार्ड (Aadhaar Card) सोबत ठेवावे लागणार आहे. कारण साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आधारकार्ड दाखवले तरच शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन मिळणार आहे. शिर्डीचा साईबाबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केवळ महाराष्ट्र आणि देशातूनच नाही तर जगभरातून लाखो भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे शिर्डीच्या साई मंदिरात नेहमीच भक्तांची मोठी गर्दी असते. श्री साईबाबांच्या दर्शन पास आणि आरती पास सुविधांमध्ये साई संस्थान प्रशासनाने बदल केला आहे. या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Tuljapur Bandh: आज तुळजापूर बंद ची हाक; दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद)
साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ न देण्याची काळजी साई संस्थान घेणार आहे. आता दर्शन पास आणि आरती पास घेण्यासाठी साईभक्तांचा मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर हा बंधनकारक करण्यात आला आहे. यात गरज पडल्यास आणखी बदल केला जाणार असल्याचं श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सांगितले. साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर बुकींग करावे असे आवाहन CEO पी.शिवा शंकर यांनी भक्तांना केले आहे.
दरम्यान साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आधारकार्ड दाखवले तरच शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन मिळणार आहे. या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.