Tuljapur Bandh: आज तुळजापूर बंद ची हाक; दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद
महाराष्ट्र राज्य सरकार कडून 1300 कोटींचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा देण्यात आला आहे. शहरवासियांच्या मागणीनुसार नव्याने दर्शन मंडप हा राजे शहाजी महाद्वार आणि राजे जिजाऊ महाद्वार यांच्या समोर विजय वाचनालय, अॅडमिन बिल्डिंग, उंबर झरा आणि त्याच्या नजिकच्या जागेवर व्हावा.
यंदाचा नवरात्र उत्सव (Navaratri Utsav) अगदी तोंडावर आला आहे. पण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर मध्ये मात्र तुळजाभवानी मंदीर (Tuljapur Bhavani Mandir) विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. आज यावरूनच तुळजापूर बंदची (Tuljapur Bandh) हाक देण्यात आली आहे. दर्शन मंडप मंदिरातच व्हावा या आग्रही मागणीसाठी आज तुळजापूर बंद आहे.
तुळजापूर भवानीच्या मंदिरात दर्शन मंडप घाटशीळ येथे करण्यास पुजार्यांचा, व्यापारी आणि काही स्थानिक लोकांचा विरोध आहे. त्यांच्याकडून तुळजापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा शारदीय नवरात्र उत्सव 15 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. त्यामुळे मंदिरातही तायारी सुरू आहे. देवीची मंचकी निद्रा सध्या सुरू असून 15 ऑक्टोबरला घटस्थापना होईल. आता या नवरात्रीची तयारी सुरू असताना विकास आराखडा सह अनेक मुद्द्यांवरून आक्षेप घेतले जात आहेत. पुजारी आक्रमक झाले असून त्यांनी तुळजापूर बंदची हाक दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार कडून 1300 कोटींचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा देण्यात आला आहे. शहरवासियांच्या मागणीनुसार नव्याने दर्शन मंडप हा राजे शहाजी महाद्वार आणि राजे जिजाऊ महाद्वार यांच्या समोर विजय वाचनालय, अॅडमिन बिल्डिंग, उंबर झरा आणि त्याच्या नजिकच्या जागेवर व्हावा. हि जागा सार्यांसाठीच सोयीची असेल. पण आतापर्यंत झालेल्या प्रेझेंटेशन मध्ये या दर्शन मंडपाची जागा दाखवण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयातून जाहिरात दिल्यानंतर या दर्शन मंडपावरून वाद झाला आणि आज बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानीच्या अलंकारांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले काही दागिने गायब; संभाजीराजे छत्रपती यांची चौकशीची मागणी .
आज शांततेच्य मार्गाने तुळजापूर मध्ये बंद पाळला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्याबाबतचं एक निवेदनही देण्यात आलं आहे. विकास अरखड्यानुसार दर्शन मंडप घाटशीळ भागात बांधण्यास काही पुजारी, व्यापारींचा विरोध आहे. तुळजापूरच्या नव्या विकास आराखड्यानुसार, वातानुकुलित सभागृह उभारून तेथून दर्शनाची रांग जाणार आहे. या मार्गावर 10 वातानुकुलित सभागृह असतील. लाखभर भाविक क्षमता असलेले हे भव्य सभागृह उभारण्यात येणार असून एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे दर्शन घेणं सोप्प होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2023 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

