Photo Credit- X

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील विविध शिव मंदिरांमध्ये (Mahashivratri) भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर, बनेश्वर आणि कपिलेश्वर यासारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शन घेत आहेत. सर्व शिवालयांमध्ये आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली असून तेथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुकर दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. शिर्डी येथे साई मंदिरात (Sai Baba Temple) देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी साई मंदिर  सुशोभित करण्यात आले आहे. (Bhidbhanjan Bhavaneeshvar Mahadev Temple: महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी द्वारका येथील भिडभंजन भवानीेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग चोरीला; तपास सुरु (Video))

साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

अमेरिकेती एका साई भक्ताने दिलेल्या देणगीतून मंदिराची संपूर्ण सजावट करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांना महाप्रयादाचा लाभ मिळत आहे. रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. दरवर्षी