महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरांवर पेट्रोल टाकून घर जाळण्याचे आदेश संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीच दिले असल्याचा खळबळजनक आरोप सदा सरवणकर यांनी दिले आहेत. सदा सरवणकर यांनी 2009 साली आमदारकीचे तिकीट कापलं तेव्हा काय झालं? हे आज कोल्हापूर मध्ये बोलताना म्हटलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सदा सरवणकर हे शिंदे गटासोबत आहेत.
सदा सरवणकर यांच्या दाव्यानुसार, 'आमदारकी नाकरल्यानंतर त्यांनी मनोहर जोशींना सल्ला विचारलं तेव्हा त्यांनी आपल्याला मातोश्री वर ताकद दाखवण्यास सांगितलं. सुमारे 3 हजार शिवसैनिक घेऊन मातोश्रीवर पोहचवल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला उमेदवारी देऊ शकत नसल्याचं कारण न देता सांगितलं. थोड्या वेळाने मिलिंद नार्वेकर यांच्याकडून मिळालेल्या निरोपामध्ये मनोहर जोशींमुळे उमेदवारी गेल्याचं सांगितलं. ही शिवसैनिकांची शक्ती घेऊन त्यांच्याकडे जा आणि मोर्चा काढा असं सांगितलं.
सदा सरवणकर यांनी त्यांचा मोर्चा जोशींच्या घरावर नेला. 'मातोश्री'च्या आदेशासमोर आपण गुरू देखील बघत नाही असं म्हणत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. काही अंतर पुढे गेल्यानंतर संजय राऊतांचा फोन आला. त्यांनी जोशींकडे जात असाल तर त्यांच्या घराजवळ पेट्रोल पंप आहे तेथून पेट्रोल घेऊन जा आणि सारं जाळा असे आदेश दिले. Uddhav Thackeray On SC Decision: 'सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निर्णय' - उद्धव ठाकरे यांनी दिली सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया
'मनोहर जोशी यांच्या घराजवळ गेल्यानंतर तेथे आधीच काही शिवसैनिक, कॅमेरे शूटिंग आणि मीडीयाकर्मी होते' असं सदा सरवणकर म्हणाले आहेत. यावर ठाकरे किंवा राऊतांकडून प्रतिक्रिया आली नाही परंतू अंबादास दानवे यांनी कॉंग्रेसमध्ये जाऊन आता शिंदे गटात गेल्यावर इतक्या वर्षांनी त्यांना या घटनेची आठवण येत असल्याचं आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे.