रोहीत पवार आणि शरद पवार ( फोटो- ट्विटर)

नुकतीच राष्ट्रवादी पक्षाची (National Congress Party) पार पडलेल्या सभेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांची सातऱ्यात (Satara) तर, कर्जत- जामखेड (Karjat-Jamkhed) परिसरात रोहित पवार (Rohit Pawar) यांचीही प्रचार सभा पार पडली आहे. शरद पवार यांच्या सभा दरम्यान जोरदार पावसाने सुरुवात केली. परंतु, त्यावेळी शरद पवार या सभेत न थांबता भर पावसात भाषण सुरुच ठेवले. तसेच रोहीत पवार यांच्याही सभेत पावसाने हजेरी लावली. मात्र, रोहित यांनीही आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही सभा गाजवली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

साताऱ्यात शरद पवार हे भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी ते बोलत असतानाच पाऊस सुरु झाला. पावसात भिजत शरद पवार यांनी त्यांचे भाषण सुरु ठेवले. वरुणराजा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. आता महाराष्ट्रात परिवर्तन नक्की घडेल असे शरद पवार त्यावेळी म्हणाले. तसेच कोणतीही चूक हातून झाली तर, ती मान्य करायची असते. लोकसभेच्या वेळी साताऱ्यात मी चूक केली आता ती सुधारा आणि श्रीनिवास पाटील यांना विजयी करा असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या विरोधात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे देखील वाचा-Maharashtra Assembly Election 2019: राजकीय पक्षांच्या आज दिवभरातील प्रचारसभेच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक

एनसीपीचे ट्वीट-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही तासच राहिले असून येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.