Rohit Pawar | (Photo Credit: Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2021) कार्यक्रमात पावसात भाषण ठोकले. या प्रसंगी अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'त्या' सभेची आठवण झाली. ज्या सभेने विधानसभआ निवडणूक 2019 मध्ये महत्त्वाची कामगिरी भूषवली. या सभेत शरद पवार यांनी भर पावसात सभा सुरु ठेवली होती. या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाने जनतेच्या काळजाला हात घातला आणि अवघे राजकीय वातावरणच फिरले.  आज कोणती राजकीय सभा नव्हती. परंतू, एकूण वातावरण पाहून मात्र लोकांना शरद पवार यांची आठवण आली.

रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. याच मतदारसंघात शिवजयंती निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच वातावरण काहीसे वेगळे बनले होते. वातावरणात काहीसा गारवा होता. आभाळ ढगाळ होते. केणत्याही वेळी पाऊस कोसळू लागेल अशीच काहीशी स्थिती होती. (हेही वाचा, Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आजच्या दिवशी शरद पवार यांनी भर पावसात गाजवली होती सातारा येथील सभा; पाहा संपूर्ण व्हिडिओ)

शिवजयंतीचा कार्यक्रम सुरु झाला. रोहित पवार भाषणासाठी व्यासपिठावर उभे राहिले. या वेळी पावसाला सुरुवात झाली. परंतू, पाऊस आहे म्हणून रोहित पवार यांनी भाषण थांबवले नाही. त्यांनी भाषण सुरुच ठेवले. पावसातले भाषण संपल्यानंतर हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.

या वेळी बोलताना रोहित पवार यांनी आयोजकांचे आभार मानले. रोहित पवार म्हणाले पाऊस असला तरी आपण प्रयत्न केले. कार्यक्रम घेतला हे महत्त्वाचे. आपल्या प्रयत्नाचे मी कौतुक करतो असेही रोहित पवार या वेळी म्हणाले. कार्यक्रमाचा दिवस आणि उद्देश महत्त्वाचा. जनकल्याणासाठी काम करत राहिले पाहिजे असेही रोहित पवार या वेळी म्हणाले. या सभेवेळी अनेकांना शरद पवार यांनी सातारा येथे केलेल्या भाषणाची आठवण आली.