Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आजच्या दिवशी शरद पवार यांनी भर पावसात गाजवली होती सातारा येथील सभा; पाहा संपूर्ण व्हिडिओ
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019) मध्ये आजच्या दिवशी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकारणाला नवे वळण दिले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आजच्या दिवशी  पावसामुळे अनेक राजकीय नेत्यांना सभा आवरत्या घ्याव्या लागल्या होत्या. एवढेच नव्हेतर, काहींना सभा रद्दही कराव्या लागल्या होत्या. मात्र, शरद पवार यांनी भर पावसातच सभा घेत विरोधकांना खुले आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले होते. आजच्या दिवशी शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेसाठी उपस्थिती लावली असताना पावसाचे आगमन झाले होते. मात्र, त्यावेळी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण सुरु ठेवले होते. त्यानंतर सोशल मीडियावर शरद पवार यांच्या नावाची चर्ची रंगली होती.

या सभेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अनेक राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल अनेकांना उत्कुसता होती. याचदरम्यान, शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पावसाची सुरुवात झाली होती. परंतु, लोक समोर भिजत असल्याने शरद पवार यांनी आपल्या डोक्याची छत्री बाजूला करत आपले भाषण सुरु ठेवले होते. शरद पवार यांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हे देखील वाचा- महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी NCP अध्यक्ष शरद पवार घेणार पंतप्रधानांची भेट, केंद्राकडे करणार भरीव मदतीची मागणी

व्हिडिओ-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019 च्या निकालात भारतीय जनता पक्षाने 105 जागा मिळवल्या होत्या. तर, शिवसेनाच्या पक्षाला 56 जागेवर विजय मिळवता आला होता. तसेच कॉंग्रेसने 44 जागेवर विजय मिळवला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने 54 जागेवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या या यशाला शरद पवार यांच्या सातारा येथील भाषणाने वेगळे वळण दिले होते, असे म्हटले जात आहे.