Maharashtra Monsoon 2021 Update: मुंबईसह कोकण जिल्ह्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना सज्ज व सतर्क राहण्याचे दिले निर्देश
Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

Maharashtra Rains 2021 Update: यंदा महाराष्ट्रात वेळेच्या आधी वरुणराजाचे आगमन झाले आहे. उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही झालेले लोक पावसाच्या येण्याने सुखावले. कोकणात तर तौक्ते वादळानंतर पावसाने तर चांगलाच जोर धरला आहे. मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आाल आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे.रुग्णसेवेत अडथळा येणार नाही याची काळजी घेत नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महाराष्ट्रात पावसाने शिरकाव केला असून वेळेआधी सुरु झालेल्या पावसामुळे नागरिक सुखावले. मात्र आता पुढील 5 दिवस राज्यात मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Monsoon 2021 Update: राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं आगमन

दरम्यान सर्व सुरक्षा यंत्रणांनी सज्ज राहून सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. नागरिकांनी ही काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.